Share

उद्या आसरामचा फैसला ; जोधपुरमध्ये हाय अलर्ट !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून 6 तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत.

आसाराम गेल्या 5 वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये 21 एप्रिलपासून 10 दिवस कलम 144 (जमावबंदी) लागू केले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!