🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील मराठमोळा हॅण्डसम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथ सोशल मिडीयावर अक्टीव्ह असतो. आपले विविध फोटोशूट तो चाहत्यांशी शेअर करतो तर कधी लेक जिजासोबतची खोडकर मस्तीसुध्दा व्हिडीओद्वारे पोस्ट करतो.आदिनाथने नुकतंच एक फोटोशूट शेअर केलं आहे.
खरं तर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द कपल म्हणजे आदिनाथ आणि उर्मिला कोठोरे. या दोघांना एक जिजा नावाची मुलगी देखील आहे. उर्मिलासह कुटूंबातील जिजा सोबत ही तो बरेच फोटो शेअर करत असतो. मात्र नुकतच आदिनाथचं हे ब्लॅक आणि व्हाईट फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून त्याच्यावर फिदा झाले आहेत.
दरम्याने चित्रीत झालेल्या कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ मध्ये रणवीर सिंग सह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याचे लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत. त्याचा एक वेगळाच रुबाब नेहमीच पाहायला मिळतो. सिटी ऑफ ड्रिम्स या गाजलेल्या वेबसिरीजच्या दुस-या सीझनमध्ये देखील आदिनाथ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. आता आदिनाथ आगामी ‘८३’ या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना

