🕒 1 min read
जळगाव : भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. त्यावेळी, जिल्ह्यातील भाजप नेत्यांवरही नाथाभाऊंनी टीका केली.
राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते, याची आपल्याला माहिती मिळाली. भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर समजलं, असं खडसेंनी स्पष्ट सांगितलं आहे.
आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्स लावला, असं म्हणत खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.
एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारप्रकरणात माझा ईडीचा तपास होत आहे. ते कर्जही मी नियमाने फेडले आहे. विशेषत: ईडीची कारवाई हजार-बाराशे कोटी रुपयांच्या प्रकरणात होत असते, असे खडसेंनी म्हटले.
माझ्या जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक बिघडायला का मी विश्वामित्र आहे? असा सवालच एकनाथ खडसेंनी विचारला. मी साधा माणूस आहे. पण, मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे, म्हणून हे केले जात आहे, असंही खडसेंनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’ अन् त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’; राऊतांचा निशाणा
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

