Share

दमानियांची एकनाथ खडसेंविरोधात तक्रार; महिला आयोगाकडून कारवाईचे आदेश

Published On: 

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस या तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. एकनाथ खडसेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करा, असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

दमालीया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून, खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर इथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी 7 सप्टेंबर 2017 रोजी विक्रोळी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

खडसेंवर  कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अंजली दमानिया यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!