🕒 1 min read
अबुधाबी : आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चाहत्यांची हिरमोड केली. मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 129 धाव करता आल्या. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 4 विकेट्सने पराभव झाला. या सोबतच मुंबईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न देखील आणखी धूसर झाले आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अश्विनने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केला.
मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने सर्वाधिक 33 धावा केल्या. तो वगळता इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज टिकू न शकल्याने आयपीएल स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा सिझन साधारण गेला आहे.
या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तरीही, मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करेल असा विश्वास टीमचे बॉलिंग कोच शेन बॉन्ड याने व्यक्त केला आहे. याचा फॉर्म्युला देखील यावेळी त्यांनी सांगितला आहे. यूएईच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईने सर्वश्रेष्ठ कामगिरी केलेली नाही, हे बॉन्डनं यावेळी मान्य केलं. ‘आम्ही ठीक खेळत आहोत. पण ही आमची सर्वश्रेष्ठ कामगिरी नाही, याची आम्हाला जाणीव आहे. असं असलं तरी, अजूनही स्पर्धा बाकी आहे.
पुढे बॉन्ड म्हणाला, ‘आमचं लक्ष्य पुढील सामन्यांवर आहे. आम्ही फक्त 5 मॅच जिंकल्या आहेत. आता उर्वरित 2 मॅच चांगल्या फरकानं जिंकल्या आणि अन्य काही मॅचचे निर्णय आम्हाला हवे तसे लागले, तर आम्हाला अजूनही ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची संधी आहे.’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईची बॅटिंग पुन्हा गडगडली; दिल्लीचा चमकदार विजय
- मराठमोळा ऋतुराज सर्वात जलद 500 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज, मारला 108 मीटर लांब षटकार
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

