🕒 1 min read
मुंबई : अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती हिंसाचार या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. नवऱ्याने मारहाण करणे याला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही असे भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
‘नवऱ्याने मारणे याला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात असे अनेक बायकांना माहित नाही. नवऱ्याने मारणे म्हणजे संसाराच एक भाग आहे असा समज महिलांचा झाला आहे. बाईला हे माहितच नाही की कशाला कौटुंबीक हिंसाचार म्हणतात. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे सर्वात जास्त लॉकडाऊनच्या काळात झाली आहेत असेही वाघ म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ऐरवी दिवसातून तीनदा जेवणारे आपण लॉकडाऊनच्या काळात पाच पाच वेळा जेवायला लागलो, याचा सर्व ताण घरातील बाईंवर पडायला लागला. मिडल क्लास असूद्या कि अप्पर मिडलक्लास किंवा उच्च वर्णीय सर्वच महिलांना यातून जावे लागत आहे. कोरोनाकाळात कमाई कमी झाली मग घर कसे चालवायचे पैसे कसे आणायचे या कारणामुळे पुरुष वर्गावर प्रचंड ताण आला.
अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून
“घरगुती हिंसाचार”विषयावर तज्ञांकडनं मार्गदर्शन करण्यातं आलं लॉकडाऊन च्या काळात १४० परीवाराचं समुपदेशन करत संसार वाचवण्यात @AntyodayaP_NGO ला यश आलयं
या कार्यक्रमाला @fadnavis_amruta जी प्रमुख पाहुण्या लाभल्या ज्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला pic.twitter.com/yczUND72br— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 1, 2021
आहे त्या पैशात घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली. आणि हा ताण पुरुष मंडळीनी महिलांवर काढण्यास सुरुवात केली. आधी शिवीगाळ, अंगावर हात टाकणे अशा विविध परिस्थितीतून बाई जायाला लागली असे चित्रा वाघ म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
