Share

परमबीर सिंगला देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.

यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. परमबीरांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देखील केंद्राने त्यांना पाठीशी घातले, त्यांच्यावर फार पूर्वीच केंद्रांनी कारवाई करायला हवी होती. असे वक्तव्य देखील नाना पटोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!