नागपूर : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळांच्या परिणामामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.
मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रातील सोयाबीन मातीमोल झाले आहे. तर कापसासह इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने तीन दिवसांत पिक नुकसानीचे पंचनामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
या दरम्यान मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पुरामुळं जीवितहानी आणि वित्तहानी झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हेक्टरी 25 हजार द्यावी असल्याचं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना येत्या 7 दिवसात तातडीनं मदत द्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. आमची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळावी अशी आहे. मात्र सरकारनं किमान 25 हजार रुपये शेतकऱ्यांना येत्या सात दिवसात द्यावेत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यवतमाळमधील वाहून गेलेली बस सापडली; चालकासह एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- ‘त्याच्यासाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत’; इशान किशनच्या भवितव्याबाबत रोहितचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
