Share

ईडीची पिडा! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर ईडी आनंदराव अडसूळांची चौकशी करणार

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. सोमवारी चौकशीसाठी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. मात्र, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यामुळे आनंदराव अडसूळ यांची चौकशी काही दिवसांसाठी टळली. मात्र, मिळालेल्या माहितीनूसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. त्या अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

अडसूळांवर नेमके आरोप काय?
सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. त्यातील जवळपास ९ हजार खातेधारक होतो. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप बडनेराचे (जि.अमरावती) अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांच्या अमरावतीच्या नवसारी घरावरही ईडीने छापा टाकल्याची चर्चा होती. पण, अमरावती येथील त्यांच्या घरी ईडीने छापा टाकला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी आनंदरावर अडसूळ यांनी बीपी व शुगरचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!