Share

सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले

Published On: 

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गेले आहेत. सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. यानंतर मुरगूड येथे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयाशी मिळून १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही कला पण एक वेगळीच कला आहे. मुश्रीफ यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर हे स्वतःच स्वतःच्या जावयाच्या कंपनीला दिलं, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

तर सोमय्या यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सोमय्यांनी तिसरा घोटाळा जाहीर केला. खरे तर ते दहा अकरा वर्षापूर्वीचे जुने कारखाने आहेत. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही तरी काढा असं त्यांना सांगत होतो. पण त्यांनी एक जावई शोध लावला आणि आज आणखी एक घोटाळा काढला. त्यात माझ्या जावयाचं नाव घेतलं. मी त्यांना सूचना करेल जावयाचं नाव आणि कुटुंबीयांचं नाव ते सातत्याने घेत आहेत. हे काही बरोबर नाही. ज्याचा कशाचाही संबंध नाही. माझा जावई स्वत:चा व्यवसाय करत आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सोमय्या करत आहेत. हे निषेधार्ह आहे,’ असं मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!