🕒 1 min read
मुंबई : येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कसून तयारी सुरु केली आहे. युती-आघाडीचे समीरकरण बदलल्यानंतर होणाऱ्या या महत्वाच्या निवडणुका असल्याने जनता कोणाला कौल देणार हे महत्वाचं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना देखील इच्छूक असल्याचे समोर आले आहे.
काल, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन्ही शहरांमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावा असे आवाहन शिवसैनिकांना आणि नेत्यांना केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील अप्रत्यक्षरीत्या जहरी टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला आता नारायण राणे यांचे थोरले पुत्र व भाजप नेते निलेश राणे यांनी जशाच तसं विखारी शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
संज्याची औकात…. pic.twitter.com/pmaTs0XEIB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 26, 2021
‘संज्याने कारण नसताना पुन्हा आमच्यावर टीका केली. एक दिवस पण आम्ही जेलमध्ये नव्हतो. त्याच दिवशी रात्री आम्ही घरी परत आलो. तुझा मुख्यमंत्री असताना देखील आमचं काय उखाडलंस तू? तुझी औकात आम्हाला चांगलीच माहीत आहे. समोर आल्यावर तू कसा पायावर पडतोस हे आम्हाला माहित आहे. तू अजून निलेश राणेंच्या समोर आलेला नाहीस. समोर ये कधी मग सांगतो. आता सत्ता आहे तोवर मजा कर. ज्यावेळी सत्ता जाईल तेव्हा काय अवस्था होईल तुझी हे महाराष्ट्र बघेल. तो दिवस लांब नाही,’ असं म्हणत अत्यंत विखारी शब्दांत निलेश राणे यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारांकडून या नेत्यांनी केवळ लुटा हेच शिकलं; आता पवार, ठाकरेंना आव्हान देतो की हिम्मत असेल तर…’
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- वयाच्या 40 व्या वर्षी ‘थाला’ची कमाल सुरूच; केला ‘हा’ मोठा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
