Share

अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना आम्ही गांभिर्याने घेत नाही- शंभूराज देसाई

Published On: 

🕒 1 min read

सातारा : सातारा जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याकडे पोलीस गांभीर्याने पाहत नाहीत.  संशयितांना सोडणार नसल्याचे गृह राज्यमंत्री सांगत असले, तरी कोणाला पकडले ते त्यांनी सांगावे, असे भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला होता.  चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना शंभूराज देसाई यांनी खोडून काढले आहेत.

चित्रा वाघ अपुऱ्या माहितीच्या आधारे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांचे म्हणणे आपण गांभीर्याने घेत नाही. वाघ यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास केवळ सातारा नव्हे तर राज्यातील पोलीस चांगल्या पद्धतीने करत आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. शासकीय विश्रामगृहात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.

महाबळेश्वरला घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने चित्रा वाघ यांनी माझ्यावर आणि जिल्हा पोलीस दलावर आरोप केले आहेत. वाघ या सांगत असलेली परिस्थिती आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे. कोणत्याही गोष्टीवर बोलण्यापूर्वी वाघ यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये अपवाद वगळता संशयितांना पोलिसांनी अटक केल्याचे सत्य आहे. पण फक्त राजकीय मानसिकतेतून चित्रा वाघ या माझ्या आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका घेत आहेत, असा आरोपही यावेळी देसाईंनी केला आहे.

जिल्हा पोलीस दलानेच नव्हे, तर राज्य पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या तपासात चांगली कामगिरी केल्याने भाजप सरकारच्या काळापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महाबळेश्वर प्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग तपासात दिसून येईल, त्या प्रत्येकावर गुन्हे दाखल केले जातील, असेही देसाईंनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!