🕒 1 min read
मुंबई : राज्यात फसवणुकीच्या घटना घडत असलेली अनेक प्रकरणे समोर आली. फसवणुक करणारे विविध पद्धतीचा मार्ग अवलंब करत लोकांची फसवणूक केली जाते. यातच आता अभिनेते भरत जाधव यांच्या नावाखाली पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब लक्षात येताच भरतने एक पोस्ट शेअर करत नागरिकांना सावध केले आहे.
भरत जाधवयांच्या सिनेमात काम मिळवून देऊन फोटोशुटसाठी जवळपास 15000 हजार रुपयांची मागणी केली गेली आहे. त्यानंतर भरत पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘काल एका व्यक्तीचा मेसेज आला की तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.’
https://www.instagram.com/p/CURTvhNohpW/?utm_source=ig_web_copy_link
पुढे लिहिले की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाही. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका’, संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, अशी पोस्ट भरत जाधवने केली आहे.
दरम्यान याआधी देखील ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से’ या मालिकेत काम मिळवून देण्याचे सांगत मालिकेच्या नावाखाली अनेक कलाकारांची फसवणूक सुरु. काम देण्याचे आश्वासन देत पैसे उकळणारे फ्रॉड लोकांबाबत चिन्मयीने माहिती देत जागरूक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
