🕒 1 min read
पुणे : महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत.आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, ‘पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत’ असेही ते म्हणाले. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. पुण्यातही भगवा फडकवायचा आहे. तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील सडकून टीका केली.
‘चंद्रकांत पाटील तुमची किंमत मी सव्वा रुपया केली. मात्र तुम्हाला माझी किंमत करता येणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्यावर दावा दाखल करण्यापूर्वी लक्षात घ्यावे कि मी कधीच कोणता दावा हरलेलो नाही. आता भाजपने सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी कि 2024 मध्ये ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार आहेत . त्यामुळे भाजप ठाकरे सरकारचा बालही बाका करू शकणार नाही. शिवसेना आग आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका,’ अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादा, माझी नाही तर तुमची किंमत सव्वा रुपयांची; राऊतांची खोचक टीका
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
