🕒 1 min read
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. अनिल परब यांना पाठवण्यात आलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी त्यांना 31 ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांना 29 ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली होती.
अनिब परब यांना ईडीने समन्स बजावण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये ईडीकडून अनिल परब यांना मनी लॉण्ड्रिंगच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कामांचे कारण पुढे करत अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सचिन वाझेने केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल 20 कोटी रुपये मिळाल्याचा दावा सचिन वाझेने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- ‘ऐनवेळी परीक्षा रद्द करून आरोग्यमंत्री व राज्य सरकारने विद्यार्थ्यांना टोपी घालण्याचे काम केले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
