Share

कोरोनाचा पूर्णपणे नायनाट होऊ दे; ‘महाराष्ट्र देशा’च्या गणेशोत्सवात महिलांचे बाप्पाकडे मागणे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘महाराष्ट्र देशा’ने गणेशोत्सवात दररोज विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरती करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आरोग्य, राजकारण, सांस्कृतिक, पत्रकारिता, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील महिलांना निमंत्रित करून त्यांना आरतीचा मान देण्यात आला. स्त्री ही आदिशक्तीचे रुप आहे. आणि याच संकल्पनेनुसार महाराष्ट्र देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरवले. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव सांगत दिलखुलास चर्चा केली.

‘महाराष्ट्र देशा’चा गणेशोत्सवात माजी नगरसेविका माधुरी अदवंत, पीएसआय पुनम पाटील, सामाजिक क्षेत्रातील अनुराधा पुराणिक, कोमल तसामड, पत्रकारितेतील रोशनी शिंपी, विद्या गावंडे, आरतीश्यामल जोशी, मोहसिना सय्यद, अर्चना जोशी, नीलिमा पाका, पृथा वीर, भाग्यश्री जगताप, तृप्ती डिग्गीकर आदींना आरतीचा बहुमान मिळाला. यावेळी बोलतांना, माधुरी अदवंत यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत निषेध व्यक्त करत, महिलांना सुरक्षित ठेव असे मागणे बाप्पाकडे मागितले. तर अनुराधा पुरानिक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना निरामय आयुष्य लाभू दे अशी कामना केली.

पीएसआय पुनम पाटील यांनी कोरोना काळातील पोलिसांचे अनुभव कथन केले. तर महिला पत्रकारांनी सध्याच्या काळात महिला पत्रकारांची समाजात कशाप्रकारे आवश्यकता आहे याचे महत्त्व विशद करत नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना मोलाचा सल्ला दिला. जर या क्षेत्रात मुलींना यायचे असेल तर, सर्वप्रथम निडर होऊन आलेल्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद तुमच्यात हवी. समाज, जग काय म्हणेल टीकाटिप्पणी याकडे लक्ष न देता आपल्या कामावर कशाप्रकारे लक्ष द्यावे यासाठी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!