🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचा खरा चेहरा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. जर त्यांचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने बेईमानी केली असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत शिवसेनेवर निशाणा साधला.
मुनगंटीवार यांच्या या विधानाचा शिवसेनेनं चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सुधीरभाऊ, काळाच्या ओघात भारतरत्न वाजपेयीजी, अडवाणीजी, महाजनजी, मुंडेजी यांचे फोटो लहान झाले,अनेक ठिकाणी यांचे फोटोही दिसत नाहीत! गरज सरो व वैद्य मरो हि संस्कृती भाजपची आहे !आम्ही आजन्म बाळासाहेबांचा फोटो व नाव घेऊनच मिरवणार,’ असं शिवसेना नेत्या डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
सुधीरभाऊ @SMungantiwar
काळाच्या ओघात भारतरत्न वाजपेयीजी, अडवाणीजी, महाजनजी, मुंडेजी यांचे फोटो लहान झाले,अनेक ठिकाणी यांचे फोटोही दिसत नाहीत! गरज सरो व वैद्य मरो हि संस्कृती @BJP4India ची आहे !आम्ही आजन्म बाळासाहेबांचा फोटो व नाव घेऊनच मिरवणार -डॉ मनीषा कायंदे@BJP4Maharashtra https://t.co/U1q2z12JLX pic.twitter.com/iAWnppSXuL— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) September 20, 2021
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले होते ?
‘शिवसेनेचा खरा चेहरा बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होईल. भाजपने युती तोडली असं म्हणणं म्हणजे ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल. ज्यादिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपाचे १०५ आमदार आले तेव्हा असे वाटलं की आता भाजपा कुणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन कठीण आहे. तेव्हाच निकालाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली.’
‘शिवसेनेने युतीसाठी कधी प्रयत्न केला नाही. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. बेईमानीचं आयुष्य फारकाळ टिकत नाही. २०२४ ला अथवा जेव्हा कधीही महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल तेव्हा जनता मविआ नेत्यांची लक्तरे फाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम एका दिवसाने वाढला, जामीन अर्जावर उद्या निकाल
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
