🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वाद आरोप-प्रत्यारोप आता वेगळेच वळण घेत आहे. किरीट सोमय्या आज कोल्हापूरला निघाले असता पोलिसांनी त्यांना मध्येच कराड येथे अडवले आहे. किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद विरोधी पक्षावर टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की,लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. तर यावरच संजय राऊत यांनी कालची कारवाई गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाकडून आरोप करणे हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट असून आजकाल त्यांच्यासाठी आरोप करणे हा एक स्टंट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तर आज कराड येथे किरीट सोमय्यांना रोखणे ही कारवाई कायद आणि सुव्यवस्थेसाठी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज केंद्रावरही आरोप केले जातात. मात्र भाजपने कितीही आरोप केले तरीही ठाकरे सरकार झुकणार नाही. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना काही आरोप करायचे असतील किंवा काहीही असेल तर त्यांनी राज्य प्रशासनाकडे याची तक्रार करावी, असा सल्लाही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
