🕒 1 min read
नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंगआणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत होता. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून देखील सिद्धू हे खोड्या काढत असल्याचे दिसत होते यामुळेच वैतागून अखेर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या मिळत असलेल्या मिळालेल्या सुखजिंदर रंधावा यांचं नाव काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी निश्चित केलं आहे.
या संदर्भातील प्रस्ताव काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. आता यावर केवळ सोनिया गांधी यांच्याकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तर माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास स्पष्टच नकार दिला. त्यानंतर, सुखजिंदरसिंग रंधवा यांचं नाव निश्चित करण्यात आले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल.
सोनिया गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. मी गेल्या 50 वर्षांपासून हेच म्हणते आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाला नकार दिला असून आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित होईल, असेही अंबिका सोनी यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
