🕒 1 min read
बीड : बीडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली. ‘तत्कालीन फडणवीस सरकारने केवळ घोषणा केली. पण, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले होते.
त्यांच्या या टीकेवर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी समाचार घेत जोरदार टोला लगावला आहे. ‘धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते. हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनीही हसायला हवे होते, असा टोमणा प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावलाय.
तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमातही खा.मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि आमदार संदिप क्षीरसागर यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. रस्ते आणि त्यावरील खड्ड्यावरून टीका करताना त्या म्हणाल्या की, ‘कोण रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीचच कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरायचं आणि आपणच काम केल्याचा आव आणायचा. याचा एक नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढतात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न.’
‘मात्र, जो रस्ता यांच्या अधीपत्त्यात येत नाही त्या रस्त्याच्या बातम्या येतात. याउलट श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते तर मी समजून घेतले असते. पण राष्ट्रवादीचे हे आमदार केंद्रात सत्ता भाजपची आणि रस्त्यावर खड्डे पडले, की म्हणतात खासदारांना विचारा आणि दुरुस्तीचा निधी आला की म्हणतात आम्ही आणला. अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
