Share

विघ्नहर्ता पावला : ‘या’ ८ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काल राज्यात उत्साहाच्या वातावरणात व निर्बंधांचे पालन करून घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले. संकटनाशक, विघ्नहर्ता अशी ख्याती असलेले श्री गणेश प्रत्येकासाठी आनंद घेऊन येण्यासह अडथळे दूर करतात अशी ख्याती आहे. त्यामुळेच संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट राज्यासह देशावरून दूर होऊन सर्व काही सामान्य व्हावं अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली जात आहे.

विघ्नहर्त्याच्या आगमना दिवशीच मोठा दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. काल राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण सापडला नाही. यामध्ये धुळे, हिंगोली, परभणी, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मोठी मदत होत असून जिल्ह्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

दरम्यान, मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. काल राज्यात ४ हजार १५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ४ हजार ५२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना स्थिती अधिक आटोक्यात येण्यासाठी येत्या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आव्हान देखील प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!