🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याची चित्रपटातील धार्मिक वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. सध्या सैफ ‘भूत पोलीस’ या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील भुमिकेविषयी त्याने रियल लाइफबाबत देखील मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला की, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे. धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो . मला वाटतं धर्मामुळे माझा देव, तुमचा देव, कुणाचा देव चांगला आणि योग्य अशा समस्या उद्भवू लागतात. मी प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. हे खूप चुकीचे की एकदा तुमचा मृत्यू झाला की सगळं संपलं. त्यानंतर मग काही होवू शकत नाही”, असे यावेळी सैफने म्हंटले आहे.
https://www.instagram.com/p/CTjPsvtot97/?utm_source=ig_web_copy_link
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहाता निर्माते रमेश तौरानी यांनी ‘भूत पोलीस’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात’
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- स्थानिक पातळ्यांवर अजूनही महाविकास आघाडीत बिघाडी? खुद्द अजित पवारच म्हणाले…
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
