Share

एट्रॉसिटी प्रकरण; करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

बीड : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर करुणा शर्मा यांनी आज बुधवारी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.१४) सुनावणी होणार आहे.

रविवारी (दि.५) परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्या दोघांनाही पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करुणा शर्मांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!