Share

संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कोथळा काढण्याची भाषा केली होती. त्याच्या या वक्तव्यावरुन भाजपने राऊतांना टीकेचे लक्ष्य केले होते. ‘कोथळा काढण्याची भाषा ही धमकी असून आपल्या संस्कृतीला शोभणारी भाषा नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना अटक करावी’, अशी मागणी आता भाजपने केली आहे.

दरम्यान यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला खोचक टोला लगावला आहे. ‘भाजप माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?’, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिवचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं. अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!