Share

‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नेट फ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षीत मनी हाईस्टचा वेब सिरीजचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. हि वेब सिरीज पाहण्यासठी अनेकजणउत्सुक होते. अखेर मनी हाईस्टचा पाचवा भाग रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा देखील याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर या सीरिजच्या निमित्तानं मीम्स देखील सोशल मिडीया धुमाकूळ घालत आहे. सध्या सोशल मिडीयावर ‘मनी हाईस्ट’च्या कलाकारांची बॉलिवूड कलाकारांशी तुलना होत आहे ते पाहून पंकज त्रिपाठीचे चाहत्यानी संताप व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/CTboJIBjAlP/?utm_source=ig_web_copy_link

‘मनी हाईस्ट’ बॉलिवूडमध्ये बनलीच तर त्यात बॉलिवूडच्या कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागेल, कोण कोण कोणकोणत्या भूमिकेत फिट बसेल, हे या पोस्टमध्ये दाखवण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये ‘मनी हाईस्ट’चा मास्टर माइंड अल्वारो मोर्टे अर्थात प्रोफेसरच्या भुमिकेत आयुष्यमान खुराणाला दाखण्यात आलं आहे. तसेच विविध भूमिकेसाठी विविध बॉलीवूड कलाकरानाद्खव्न्यता आले आहे. तर ऑर्तुरोच्या रोलमध्ये पंकज त्रिपाठींची कल्पना केली आहे. मात्र यावरून आता चाह्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंकज त्रिपाठींची ऑर्तुरोच्या रोलसाठी कल्पना करण्यात आली आहे. ‘मनी हाईस्ट’मध्ये ऑर्तुरोची भुमिका Enrique Arce ने साकारली आहे आणि या पात्राबद्दल लोकांच्या मनात राग आहे. हे कॅरेक्टर सर्वात वाईट असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यावरून पंकज त्रिपाठीला ऑर्तुरो म्हटलं तर जीव घेईल, अशी  प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्याने दिली आहे. दरम्यान, ही केवळ कल्पना आहे तरी देखील पंकज त्रिपाठीचे चाहते नाराज झाले आहे. यावरून पंकज त्रिपाठी यांच्यावरील चाहत्यांचे प्रेम स्पष्ट दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!