Share

‘मनी हाईस्ट’वरून यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्विट, ‘तो लुटायलाच आलाय, पण जगासमोर मसिहा..’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या सुप्रसिद्ध वेबसिरीज मनी हाईस्टचा पाचवा सिझन अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पसंती मिळालेल्या वेब सीरिजपैकी एक असणाऱ्या ‘मनी हाइस्ट’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसांत लाखो लोकांनी पाहिली असुन वेब सिरीज आणि त्यातील पात्रांचे वेगवेगळ्या चर्चा आणि मिम सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. ही वेब सीरीज सध्या इंटरनेटवर ट्रेंडींगमध्ये आहे.

याच वेबसिरिजच्या कथानकाला जोडून महिला व बालविकास मंत्री आणि कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटला राजकीय किनार असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी कोणचाही उल्लेख केलेला नाहीये. परंतू नेटकऱ्यांनी मात्र याचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीशी जोडल्याचे दिसत आहे.

‘मनी हाईस्ट’बद्दल यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वत:च असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. मी राजकीय विषयांवर नाही तर मनी हाईस्ट या वेब सिरीज बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा.’ असे म्हणत खोचक टीका केली आहे.

देशात सध्या इंधनाच्या आणि गॅसच्या किमती वाढत असल्याने लोकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने सरकारच्या बऱ्याच मालमत्तांचे खासगीकरण केल्याने विरोधीपक्षाने या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. यशोमती ठाकूर या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी भाजपाची कार्यपद्धती, देशातील बेरोजगारी, महागाई आणि इंधनाची दरवाढ या विषयांवरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!