पुणे : पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
ते म्हणाले, ‘सरकार व पक्षांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, तेथे गर्दी जमत आहे. फक्त सरकारला गणेशोत्सवाची गर्दी नको आहे. नियम हे सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत. एकंदरीत या लॉकडाऊन मध्ये जे चालले आहे ते बर चालले आहे हे सर्व सरकारांना लक्षात आले आहे. आंदोलन नाही, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, लोकांनी रस्त्यावर उतरायचे नाही, त्यामुळे कोणती झंझटच नसल्याने आपापले पैसे कमवा, दुकाने चालवा असेच एकंदरीत धोरण आहे.’
कोरोनाची लाट आणि शाळांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नुसती कोरोनाची तिसरी लाट येणार, चौथी लाट येणार म्हणून भितीचे चित्र उभे केले जात आहे. शाळांमधील मुलांना लस देता येत नाही, त्यामुळे शाळा कशी सुरू करणार? मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘करुणा शर्मा यांच्याबाबत मजकूर प्रकाशित केल्यास हायकोर्टाचा अवमान’, धनंजय मुंडेंच्या वकिलाचे माध्यमांना पत्र
- ‘मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह; अन् बेअक्कल संज्या म्हणतो पापी लोकांनाच कोरोना होतो’
- शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी; संजय राऊतांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
- ‘राज्यपाल हे पॉलिटिकल एजंट, भाजपला हवे तेच ते करतात’, संजय राऊतांची वादग्रस्त टीका
- पंडित नेहरुंशी वैर का?; ‘राऊतांचा सामना’तून रोखठोक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

