🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र अशातच सर्व सामान्य लोकांना झटका बसला आहे. कारण आता पुन्हा एकदा आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकरणी सर्वसामान्य जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..!
महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी ! pic.twitter.com/jcSpffsD7N— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 1, 2021
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत लिहिले की, आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..! महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी !, अशा मार्मिक शब्दात रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने आता सामन्यांच बजेट पुन्हा कोलमडणार आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडलेले असताना सतत होणारी वाढ यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
