Share

सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ताचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल

Published On: 

मुंबई : ‘बधाई हो’ या चित्रपटात हटके विषयातून समोर असलेली बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आठवतेय ना. अभिनेत्री नीना सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच सोशल मिडियावर तिचा बोल्ड अंदाजातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तिची अनोखी अदा पहायला मिळत आहे.

नीना गुप्ताचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली. नुकतेच तिने सोशल पेजवरून ‘ आज फिर जिने की तमन्ना है’ वर डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल होताच लाईक कमेंटचा वर्षाव झाला आहे. तिचा बेली डान्सपासून ग्लॅमरस लूकपर्यंत तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

या व्हिडीओत नीना काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. या व्हिडीओत ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्यावर नीना डान्स करताना दिसत आहे. ६२ वर्षांच्या नीना गुप्ता चा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकची स्तुती केली आहे.
नीना गुप्ता लवकरच ‘८३’ ‘ग्वालियर’ आणि ‘गुडबाय’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या आधी त्यांचे ‘संदीप और पिंकी फरार’, ‘सरदार का ग्रॅंडसन’ आणि ‘छत्रसाल’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाची खास शैली पहायला मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!