🕒 1 min read
औरंगाबाद : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड (औट्रम) घाटात जवळपास आठ ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने या घाटात अडलेले आहेत. या अपघातात अद्याप जीवीत हाणी झाल्याचे वृत्त नसले तरी अनेक वाहनधारक अडकलेले आहेत. सध्या प्रशासनाच्या वतीने हा मार्ग मोकळा करण्याचे काम हाथी घेण्यात आले आहे. तसेच अडकलेल्या प्रवशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
घाटात अडकलेल्या नागरिकांसाठी चाळीसगावच्या ग्रामस्थानी तसेच समाजसेवी संस्थांनी पोलीसांच्या मार्फत या घाटात १०० पॅकेट जेवणाचे डबे, २०० पाणी बॉटल, ३०० बिस्किटांचे पाकिटे पाठवले आहेत. तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कन्नड मतदार संघातील शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी घाटातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या.
मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा हा एकमेव प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे अनेकदा घाटात वाहतूक काेंडीची समस्या देखील समोर येते. त्यात आता हा मार्ग बंद पडल्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला आहे. प्रशासनाच्या वतीने मार्ग मोकळा करण्याचे आणि अडकलेल्या गाड्या काढण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले

