🕒 1 min read
मुंबई : काल सायंकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान काही वेळापूर्वी अनिल परब हे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी सामना कार्यालयात आले होते. १० मिनिटे या दोन्ही नेत्यांच्यात चर्चा झाल्यानंतर परब पुन्हा घाईघाईने निघून गेले. दरम्यान, या भेटीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘अनिल परब हे माझे शिवसेनेतील सहकारी आहेत. ते मंत्री देखील आहेत. त्यामुळे आमची कायम भेट होत असते,’ असं राऊत यांनी म्हटलं.
यानंतर, ते उद्या चौकशीसाठी हजर होतील का ? असा सवाल पत्रकारांनी केला असता, ‘उद्या तुम्ही तिकडे कॅमेरे लावून ठेवा. ही कायदेशीर लढाई. त्या कायदेशीरच लढल्या जातील. परब हे कायदा क्षेत्रातील जाणकार आहेत, स्वतः ते वकील आहेत. त्यामुळे त्यांना माहितीये काय करायचं आहे ते.’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. मात्र अद्यापही ते हजर होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार…’; दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधवांना अटक
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
