मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये गुरुवारी कॅरेबीयन प्रीमीयर लीग स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात जमैका तलाव्हासने सेंट लुसीया किंग्स संघाचा १२० धावांनी पराभव केला. जमैका संघाने २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट लुसीया संघाला केवळ १३५ धावांपर्यंत मजल मारता आली.
सीपीएल स्पर्धेच्या या सामन्यात सेंट लुसीयाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जमैका संघाने निर्धारीत २० षटकात ५ गडी गमावून तब्बल २५५ धावांची मजल मारली. जमैकाकडून आंद्रे रसेलने अवघ्या १४ चेंडुत ३ चौकार आणि ६ षटकारासंह ५० धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. सेंट लुसीयाकडून ओबेड मकॉयने सर्वाधीक ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात सेंट लुसीया संघाने सर्वबाद १३५ धावांपर्यंत मजल मारली. यासह जमैका संघाने सामना १२० धावांनी जिंकला. टीम डेव्हिडने सेंट लुसीयाकडून २८ चेंडुत ८ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधीक ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. मिगेल प्रिटोरियसने जमैकाकडून सर्वाधीक ४ गडी बाद केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी आंद्रे रसेलला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक
- सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; जाणून घ्या
- पुण्यातील खेळाडूंच्या सेवेत ‘पुण्यदशम’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
