पुणे : शहरातील खेळाडूंना बालेवाडी येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सरावासाठी जाण्यास पुरेशा बस सेवा नसल्याने खेळाडूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. खेळाडूंनची ही बाब लक्षात घेता महापालिकेने बालेवाडी येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सरावासाठी जाण्यास ‘पुण्यदशम’ बससेवा सुरू करण्यात आली आहे.
महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने शहरात ‘पुण्यदशम’ योजना सुरू केली आहे. या बससेवेचे तिकीट फक्त १० रुपये इतके आहे. ही बस सेवा तुम्हाला फक्त १० रुपयात कितीही वेळा या बसमधून प्रवास करण्याची परवानगी देते.
पालकांनी बालेवाडीला जाण्यासाठी खेळाडूंना मोठ्या अडचणी होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही योजना सुरू करा, अशी मागणी पालकांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव क्रीडा समितीसमोर आणला होता. दरम्यान, महापालिकेच्या क्रीडा समितीत या प्रस्तावास मंजुरी दिली असून स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी केली केली जाणार आहे.
असा असेल बसचा मार्ग
स्वारगेट ते बालेवाडी, कात्रज ते बालेवाडी, पुणे स्टेशन ते बालेवाडी, शिवाजीनगर ते बालेवाडी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंडकडे अजुनही डावाने सामना जिंकण्याची संधी’, डॉमीनिक कॉर्कने व्यक्त केला विश्वास
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
