Share

पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर

Published On: 

मुंबई : लीड्स कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला डाव ७८ धावांवर अटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली आहे. मात्र अद्यापही टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर अटोपला होता. यानंतर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारली. इंग्लंडच्या डावात कर्णधार जो रुटने १६५ चेंडुत १४ चौकारासह सर्वाधीक १२१ धावांची शतकी खेळी केली. तर भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले. यासह इंग्लंडने पहिल्या डावात भारताविरुद्ध ३५४ धावांची भक्कम आघाडी घेतली.

यानंतर दुसरा डाव खेळायला उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या डावातील अपयश विसरत दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा ९१ आणि कर्णधार कोहली ४५ धावांवर खेळत होते. यापुर्वी सलामीवीर रोहित शर्माने १५६ चेंडुत ७ चौकार आणि १ षटकारासंह ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पुजाराने १८० चेंडुचा सामना करताना १५ चौकारासह ९१ धावांची नाबाद खेळी केली आहे. अद्यापही सामन्यात टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाचा डाव किती लांबतो यावर सामन्याचा निकाल अवलंबुन आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!