Share

आम्ही विरोधी पक्षात नाही तर सत्तेत येण्यासाठी जन्मलो आहोत-नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं म्हणत त्यांनी पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेला हा इशारा दिला. आम्ही सध्या केंद्रात सत्तेत आहोत. मात्र भविष्यात आम्ही महराष्ट्रातही सत्तेत येऊ. असे विधानही त्यांनी यावेळी केले आहे. वरिष्ठांकडून काहीही आदेश आले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे. नाही तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? असा सवाल करत त्यांनी सरकारला विरोध करू दे ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. असे अनेक प्रकरणं आहेत. त्याचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाही, असे ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!