मुंबई : आगामी स्थानिक स्वराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुद्धा कंबर कसली असून काँग्रेसच्या नव्या कार्यकारणी जाहीर केली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरणी अखेर जाहीर झाली आहे.
यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे. 18 उपाध्यक्ष 65 जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरींची यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय.
दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे आणि हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळेच जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारिणीमध्ये विविध जातींचा समतोल राखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहशतवादाविरोधात आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात सर्व जगानं एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज’
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान


