Share

‘दहशतवादाविरोधात आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात सर्व जगानं एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – अफगाणिस्तानात काबुल विमानतळाच्या बाहेर काल झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 85 झाली आहे. मृतांमध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश आहे. आयएसआयएस खोरासान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काबूलमधल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध करत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. दहशतवादाविरोधात आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात सर्व जगानं एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचं या हल्यातून अधोरेखित झालं आहे, असं मत भारतानं व्यक्त केलं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गूटेरेस, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांनीही हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतरही अमेरिकेच्या आणि इतर अफगाणी नागरिकांच्या सुटकेची मोहीम सुरूच राहील, असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कट्टरतावाद्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भारतानं या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दहशतवादाविरोधात एकत्रित जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं म्हटलं आहे.

हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या इसिस-खोरासन या संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी योजना आखण्याचे आदेश त्यांनी अफगाणिस्तानमधल्या आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा हल्ल्यांमुळं आम्ही भयभीत होणार नाही, आमची मोहीम सुरूच ठेवू, असंही बायडेन यांनी सांगितलं. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही हल्ल्याचा निषेध करताना, सुटका मोहीम सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!