Share

‘मी स्वतःच्या डोळ्याने हा विनाश पाहिला’, बॉम्बस्फोटातून बचावलेल्या व्यक्तीचे चित्त थरारक कथन

Published On: 

अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी तेथील नागरिकांची धडपड सुरु असतांनाच गुरुवारी(२६ ऑगस्ट) काबूल विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये मृत व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच विमानतळावरील स्फोटाची हृदयद्रावक छायाचित्रे समोर येत असतांनाच स्फोटात वाचलेल्यांपैकी एका व्यक्तीने चित्त थरारक प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेच्या विशेष स्थलांतरित व्हिसासह आंतरराष्ट्रीय विकास गटाचे माजी कर्मचारी यांनी त्यांची आपबिती सांगितली. काबूल विमानतळ परिसरात बाहेर ते देखील बाकीच्या नागरिकांसह अफगाणिस्तानच्या बाहेर पडण्याची प्रतीक्षा करत होते.

यासाठी विमानतळाच्या एबी गेटजवळ ते सुमारे १० तास रांगेत उभे होते. याच दरम्यान संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ते म्हणाले की,’मला असे वाटले की माझ्या पायाखालची जमीन सरकली; क्षणभर मला वाटले की माझे कान फुटले आहेत, मला काहीच ऐकू येत नव्हते. मी मृतदेह आणि शरीराचे अवयव हवेत प्लास्टिकच्या पिशव्याप्रमाणे उडताना पाहिले. मी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मृतदेह, शरीराचे अवयव, वृद्ध आणि जखमी पुरुष, महिला आणि मुले पडलेली बघितली. मी स्वतःच्या डोळ्याने हा विनाश पाहिला.’असे म्हणत अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता असल्याने ओळख उघड न करण्याची विनंती देखील त्यांनी केली.

दरम्यान, ‘बॉम्बस्फोटानंतर मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी किंवा लोकांना बाहेर नेण्यासाठी देखील कोणी नव्हते. मृतदेह आणि जखमी लोक रस्त्यावर आणि गटारीत पडले होते. त्या गटारीतील पाणीही मृतदेहांच्या रक्तामुळे लाल झाले होते. शारीरिकदृष्ट्या, मी ठीक आहे. परंतु मला वाटत नाही की आजच्या धक्क्यामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून मी सावरू शकेन आणि या घटनेच्या आठवणी मला सामान्य जीवन जगू देतील.’ असेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!