Share

शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार आणि विरोधक मात्र दुसऱ्याच गोंधळात; शेतकऱ्यांचा संताप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत. मुंबई, कोकणसह विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीसह भाजपचे नेते देखील आरोप-प्रत्यारोपांमध्ये मशगुल असताना शेतकऱ्यांवर मात्र मोठं संकट आलं आहे. राज्यात अचानकपणे टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच कोरोनामुळे अधिक अडचणींचा सामना, अतिवृष्टी, चक्रीवादळ, कष्ट, खर्च हे सगळं झेलून पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

टोमॅटोच्या २० किलो कॅरेट्ला ६० ते १०० रुपये दर म्हणजे प्रति किलो ३ ते ५ रुपये भाव मिळत आहे. अशाने वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल भावनेने अक्षरशः रस्त्यावर टोमॅटो फेकत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालून उपाय करावेत, अन्यथा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो आणून टाकू, असा इशारा शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

‘अचानक भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सरकार आणि विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र आहेत. त्यांनी तो गोंधळ थांबवून ताबडतोब या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग यांना चालना देऊन टोमॅटोला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले पाहिजे. लाखो रुपये खर्चून पिकविलेला टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे,’ असं अजित नवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!