Share

‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा

Published On: 

मुंबई: शिवसेना सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील. जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्हीही तेच करू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे. नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठीच तुम्ही हे सर्व केलं का? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी हे राजकारण कसे असू शकते? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तीन पक्षांचे सरकार दोन वर्षांपासून चांगले काम करत आहे. या दोन वर्षांत कित्येक वेळा सूड घेऊ शकलो असतो. नारायण राणे हे मोदीजींचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रात राज्यातील एक मंत्री असल्याने महाराष्ट्र आनंदी होता. पण ते कसे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या विरोधात बिनडोकपणे काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवसेना सोडली होती आणि आता ते भाजपमध्ये आहेत. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदाने जगा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!