मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे सध्या तिला आणि कुटुंबीयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र यानंतर सध्या स्वतःला सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज कुंद्रा प्रकरणानंतर शिल्पा सोशल मिडियापासून देखील काही काळ दूर राहिली. मात्र आता पुन्हा एकदा ती सोशल मिडीयावर सक्रीय झाली आहे. नुकतेच तिने एका पुस्तकाचा फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले, ‘आपण आपल्या आयुष्यात पॉज बटण दाबू शकत नाही. प्रत्येक दिवस मोजतो.आपण आपल्या कठीण काळात असो किंवा आपल्या चांगल्या काळात.’

तर पुढे असे आहे की, ‘कधीकधी आपल्याला वेळेवर गोष्टी करायच्या असतात. जेव्हा आपल्याला तणाव वाटतो तेव्हा सोडून द्या. आपले आयुष्य पुढे चालले आहे, काहीही झाले तरीही. आपल्याकडे फक्त एकच वेळ आहे, बाकी काही नाही. प्रत्येक क्षण जगणे चांगले आहे, जेणेकरून वेळ आपल्या हातातून निसटू शकणार नाही,’ अशी पोस्ट करत ती आयुष्यातील कठीण काळाचा सामना कसे करत आहे हे समजून येत आहे.
काही दिवसापूर्वीच तिने लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत पाहायला मिळाली. तसेच यावेळी तिला पाहून शोमधील कलाकार आणि चाहते देखील खुश झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा तुम्ही झोपले होते काय?’ उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल झाल्याने राऊतांचा संताप
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- नारायण राणेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

