मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अटक आणि नंतर जामीनामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ‘शिवसेना सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील. जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्हीही तेच करू’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राणेंनी मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचा अपमान करणं थांबवावं आणि मर्यादेत रहावं असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ‘राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना असंसदीय भाषेचा वापर करु नये. उद्या उठून कोणी चुकीच्या भाषेचा वापर करत ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असं म्हटलं तर केंद्र सरकार त्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील,’ असं मत व्यक्त केलं.
सध्या बंगळुरुच्या शासकीय दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी ‘पंतप्रधानांविरोधात बोलणाऱ्यासाठी जो नियम लावला जातो तोच राणेंना लागू होतो ज्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा वापरली,’ असंही म्हटलं आहे. राऊत सध्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील लीला पॅलेस हॉटेलमध्ये राहत आहे. बुधवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आला.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
