Share

‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय वाद रस्त्यावर पाहायला मिळाला. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे हे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं विधान केलं होतं. त्याला भाजप नेते नारायण राणे यांनी थेट उत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल,’ असे स्पष्ट मत यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.

नारायण राणे यांना फडणवीसांच्या विधानाबाबत आणि कोर्टाच्या आदेशाबाबत विचारण्यात आले होते. त्यावर राणे म्हणाले की, ‘माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली आहे. फडणवीस हे आमचे मार्गदर्शक आहेत, आम्हाला ते मार्गदर्शन करतात. ते जे सांगतील ते मी स्वीकारेल, असं राणेंनी यावेळी सांगितले आहे.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना माझ्यामुळे वाढली आहे. जेव्हा मी शिवसेना सोडली ती शिवसेना संपली आहे. मी सर्वाना पुरून उरलो आहे. असे म्हणत त्यांनी शिवसेनेनेही असे कितीतरी वक्तव्ये केली आहेत. तेव्हा कोणताही गुन्हा दाखल का केला नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!