Share

‘सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार’ ; भाजपचा शिवसेनेला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हैदोस माजलेले पाहायला मिळत आहे. याचे कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेले आक्षेपार्ह विधान. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली आहे.

यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक ही राज्य सरकारच्या झुंडशाहीचे लक्षण आहे. राज्य सरकारने आता सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा शेवट आम्हीच करू, असा इशारा देत सरकारच्या तुघलकी कार्यपद्धतीचा निषेध व धिक्कार आहे. राज्य सरकारची झुंडशाही व महाराष्ट्र पोलिसांचा गैरकारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एका सध्या क्लिपवरून नारायण राणे यांना अटक करत असेल तर आमच्याकडे तीन तासांचा सिनेमा होईल, इतक्या सीडी आहेत. नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असे सांगूनसुद्धा त्यांना अटक करण्यात आली. राज्य सरकार झुंडशाही करणार असेल तर आम्ही तांडव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांनी हा तमाशा बंद केला नाही तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची क्लिप बाहेर काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!