🕒 1 min read
अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.
अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.
ज्योती देवरे यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल घेऊन आमदार लंके हे अण्णा हजारेंच्या भेटीला गेले होते. त्यावर, ‘मला तुमच्या भांडणात पडायचं नाही’, असं म्हणत अण्णांनी या वादात पडणार नसल्याचे सांगितले.
लंके आणि देवरे यांच्या आपापसातल्या भांडणामध्ये मला पडायचं नाही. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी या संबंधी काही बोलणार नाही. फक्त तहसीलदार मॅडमला सांगतो तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त आत्महत्येचा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरेंना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानवर विश्वासासंबंधी बायडेन यांचे खोचक वक्तव्य, म्हणाले..
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
