🕒 1 min read
पुणे : आज नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशाच एका बहिण-भावाच्या नात्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या बहिण-भावाने रक्षाबंधनाची तब्बल शंभरी पार केली आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षीही बारामतीमधील बहिण-भावाच्या राखीपौर्णिमेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सटलवाडी इथल्या अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केली आहे.
अनुसया आजी आणि गपणत आजोबांचे हे आजही या वयात एकमेकांना राखी बांधतात. १०४ वर्षांच्या अनुसया गायकवाड यांनी १०२ वर्षांच्या गजानन गणपत कदम यांना आजंही राखी बांधली आहे. यंदाची ही त्यांची पहिली, दुसरी तर दूरचं शंभरावी राखीपौर्णिमा आहे. अनुसया आजी या रक्षाबंधनाच्या दिवशी न चुकता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आजही येत असतात.
दरम्यान, पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षित समजते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज; मंत्र्यांचा रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी’
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत युती करत असतो’, रामदास आठवलेंनी सांगितले कारण
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
