🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक किस्स्यांवर प्रकाश टाकला. यासोबतच, ते आईच्या आठवणीत भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. यासंदर्भातील एक किस्सा सांगतानाच त्यांनी शिवसेनेबाबतची नाराजी देखील बोलून दाखवली.
‘माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती. आई गेल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले. पण शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखांनी भेटणं तर सोडाच साधी संवेदनाही व्यक्त केली नाही. अर्थात त्यांनी संवेदना व्यक्त करावी असा माझा आग्रह नाही,’ असं म्हणतानाच ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले शेलार ?
‘माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. आई गेल्यानंतर राज ठाकरे अर्धा-पाऊण तास त्या उन्हात थांबले होते. मला तुलना करायची नाही. त्यातून अर्थही काढायचा नाही. पण त्यावेळेला त्या आठवडाभरात एकदा नाही दोनदा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख रंग शारदाला आले होते. माझ्या घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर आले होते. पण ते घरी आले नाही. ती त्यांची मर्जी. त्यांनी फोनही केला नाही. एसएमएसही केला नाही. संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. माझ्या आईसाठी त्यांनी संवेदना व्यक्त केली पाहिजे असा माझा आग्रहही नाही. पण हे मी विसरणारही नाही,’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- वेस्ट इंडिज पाकिस्तान कसोटीत पावसाचा व्यत्यय, सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
