मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यावर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे आहे. लॉर्डस कसोटीत झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर सर्वस्तरातून टीका होत आहे. यात आता इंग्लंडचे माझी कर्णधार मायकल अर्थटन यांनी देखील सामील झाले आहे. जर पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी पाऊस आला नसता तर भारतीय संघ मालिकेत १-० असा पुढे असता. असे ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, ‘लॉर्डस् कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडने अत्यंत बालिश खेळ केला. मात्र अवघड परिस्थितीत टीम इंडियाने ज्याप्रकारे खेळ केला. ते बघून कुणीही सांगू शकत की मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी जर पाऊस नसता आले तर भारतीय संघ मालिकेत १-० असा पुढे असता’ असे ते म्हणाले. मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या २५ ऑगस्ट मासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- ‘मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अर्थकारणाचा विषय ; त्वरित सर्व मंदिरे उघडा’
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

