Share

परमबीर सिंग, सचिन वाझे पुन्हा अडचणीत ; बारमालकाने केला ‘हा’ खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. त्यांच्याबाबतीत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या सचिन वाझे व त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात वसुलीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्रवाल यांनी तक्रारीत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे.’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस दलामध्ये खळबळ माजली आहे.

दरम्यान परमबीर सिंग यांच्यावर याआधी ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात होता. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!