🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पत्रकारांनी विचारलेल्या वॉर्डनिहाय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपलं मत मांडलं आहे.
निवडणुकीच्या वेळी दोन-चार टाळक्यांचं जातींमुळे भलं होतं. त्यामुळे वॉर्डनिहाय आरक्षणामध्ये फक्त स्त्री-पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे, असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
मी बाबासाहेब पुरंदरेंकडे जातो ते ब्राह्मण म्हणून नाही तर ते इतिहास संशोधक म्हणून जातो. शरद पवारांना भेटतो तेव्हा ते मराठा म्हणून जातो का?, असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.
नशीब तुमच्या क्षेत्रात आणखी आरक्षण आले नाही, असंही राज ठाकरे पुण्यातील पत्रकारांना म्हणाले आहेत. ‘प्रबोधनकार ठाकरेंवर प्रश्न विचारला असता प्रबोधनकार कोणालाच परवडणारे नाहीत त्यामुळे त्यांना उगाच मधे आणू नका’, असं स्पष्ट शब्दात राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीचं राजकारण सुरु झालं असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तहसीलदार ज्योती देवरेंच्या आवाजाने अंगावर शहारे, आरोपांची गंभीर दखल घ्या’, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आणि यशवंतरावही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- ‘नवीन छकडा मार्केटमध्ये आलाय!’, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
- जनआशीर्वाद यात्रेने काहीही फरक पडणार नाही-बाळासाहेब थोरात
- एसटी धावतेय आधुनिकीकरणाकडे; आता घरबसल्या कळेल लाईव्ह लोकेशन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
